सुधारित डीपीआर तयार करा, दिल्लीत झाली बैठक
नागपूर: नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत, जलशक्ति मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार, मनपा आयुक्त बी राधाकृष्णन आणि जायकाच्या वरिष्ठ अधिकारीयानसोबत एक उच्चस्तरीय बैठक नवी दिल्लीत आज घेण्यात आली. या बैठकीत नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तातडीने सल्लागार नियुक्त करने, प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करणे व कामाला गती देण्याचे निर्देश जलशक्ति मंत्र्यांनी व ना गडकरी यांनी दिले.
नागनदी पुनरुज्जीवन व संवर्धन प्रकल्पाला गेल्या २७ ऑक्टोबर रोजी एक्सपेंडिचर फायनान्स कमिटी’ची मंजुरी मिळाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने वित्त विभागाच्या ‘एक्सपेंडिचर फायनान्स कमिटी’ने नाग नदी पुनरुज्जीवन व संवर्धन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होऊ शकते.
ज्या नाग नदीवरून नागपूरची ओळख त्या नागनदीमुळे होणारे प्रदूषण दूर करणे आणि स्वच्छ पाणी नागनदीत राहावे, यासाठी केंद्र शासनाने नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. नागपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात विलक्षण भर पडणार आहे. या कामासाठी आठ वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला असून या अंतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, 500 किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन, कम्युनिटी टॉयलेट निर्माण केले जाणार आहे.
शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. या नदीतून वाहणारे सांडपाणी प्रक्रिया करून स्वच्छ करण्यात येणार आहे. नदीतील सांडपाणी, कचरा, नाग नदीला मिळणार्या उपनद्या, नाले यातून होणारे प्रदूषण कमी करण्याचे काम केले जाणार आहे नागनदीचे पाणी स्वच्छ होऊन प्रदूषण संपावे यासाठी ना. गडकरींचे दीर्घ कालावधीपासून प्रयत्न सुरु आहेत.