Published On : Wed, Feb 23rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

महापौरांनी दिले नागरिकांना करंजीचे रोपटे.

ग्रीन क्रूड अँड बायोफ्युअल फाऊंडेशनचा उपक्रम.

स्वावलंबीनगर : नागरिकांना करंजी रोपटे देताना महापौर दयाशंकर तिवारी, डॉ. हेमंत जांभेकर, अजित पारसे.

नागपूर: बायोफ्युअल भविष्याची गरज होणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गेल्या एक तपासून बायोफ्युअलवर भर देत आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाऊल टाकणाऱ्या ग्रीन क्रूड अँड बायोफ्युअल फाउंडेशनतर्फे करंजी रोपट्यांचे वितरण करण्यात आले.

ग्रीन क्रूड अँड बायोफ्युअल फाउंडेशनच्या भेंडे ले आऊट, स्वावलंबीनगर येथील कार्यालय परिसरात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नागरिकांना रोपटे देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव व सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे उपाध्यक्ष डॉ. राजेश मुरकुटे, हर्षवर्धन फुके आदी उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांना करंजी रोपट्यांची काळजी घेऊन शहर हिरवे करण्याचे आवाहन केले. वर्षातून अनेकदा फाउंडेशनकडून जैवइंधन, इथेनॉल निर्मितीसाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना करंजी झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

फाउंडेशनच्या या उपक्रमात सामील होऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जैवइंधननिर्मिती अभियानाला बळकट करण्यासाठी पुढे येण्याचेही त्यांनी आवाहन केले. जैवइंधन, इथेनॉलनिर्मितीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा, थेट उद्योगाशी शेतकऱ्यांना जोडणे, उद्योग किंवा रिफाईनरी उभी करणे, रोजगारनिर्मिती, आयात केलेले कच्चे तेलावरील खर्च या सर्व बाबींवर सरकारसोबत चर्चा करण्यासाठी फाऊंडेशन पुढाकार घेत असल्याचे फाउंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी निलेश राऊत, अभिषेक मानकर, भानुदास पंचभाई, विक्रांत ठाकरे, अशोक गजभिये, संदीप मानकर, राजकुमार बनसोड, कमलेश येवले, रमेश येवले, मनोज वेल्हणकर, सचिन खैरकर उपस्थित होते.