Published On : Tue, Oct 10th, 2017

महिलांच्या सहभागामुळे उद्योगक्षेत्राला चालना – राज्यपाल

Advertisement

मुंबई : उद्योग क्षेत्रात महिलांच्या सहभागामुळे देशातील आर्थिक व्यवस्थेला चालना मिळाली असून छोट्या आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली आहे, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी सांगितले.

महिला नव उद्योकांना सन्मानित करण्यासाठी डिझायन इनोव्हेशन क्रिएटीव्हिटी एन्टाप्रेनरशीप य संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, भारतात महिलांनी अनेक क्षेत्रात क्रांती घडविली आहे. पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली तर एकोणविसाव्या शतकात वाडीया परिवारातील मोतलीबाई वाडीया आणि जेरबाई वाडीया यांनी उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. शैक्षणिक क्षेत्रातही महिला आघाडीवर आहेत. महिलांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक क्षेत्रात त्यांची कामगिरी उत्तम ठरली आहे.

ग्रामीण भागातील चित्रही आता बदलले आहे. पूर्वी केवळ नामधारी सरपंच असलेल्या महिला आता प्रत्यक्ष काम करीत आहेत. ही एक चांगली सुरुवात आहे. मात्र अजूनही समाजाची महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भातील समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

हॉस्पीटल, शिक्षण या क्षेत्रातील प्रगती महिलांच्या सहकार्याशिवाय साध्य करता आली नसती. औद्योगिक क्षेत्रात महिलांनी अधिक संख्येने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. इंदू सहानी, श्रीमती राधा कपूर खन्ना यांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे राज्यपालांनी कौतुक केले आणि यावेळी सत्कार झालेल्या सर्व महिला उद्योजिकांचे अभिनंदन केले.