Published On : Thu, Oct 6th, 2022
By Nagpur Today Nagpur News

दवलामेटी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन पर कार्यक्रम.

Advertisement

जिल्हा अधिकारी विपीन इटनकर यांनी स्वच्छते साठी दवलामेटी ची केली प्रशंसा.

दवलामेटी : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा समापन कार्यक्रम, २ ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती चे अवचीत्य साधून दवलामेटी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजी यांचा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुर्वात करण्यात आली. गावातली स्वच्छतेचे कवतुक करून दवलामेटी गावात येताच मंन अधीक प्रसन्न झाले असे उदगार जिल्हा अधिकारी विपीन इटनकर यांनी बोलुन दाखवले.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त आयुष्मान भारत योजने सोबतच ईतर शासकीय योजने बाबद् सविस्तर मार्गदर्शन मान्यवरांनी केलें. याप्रसंगी दरुभट्टी हटाव समिती चा उपाध्यक्ष प्रीती वाकडे यांनी मालकी पट्टे व ईतर विषयी समस्या मांडली त्यावर जिल्हा अधिकारी विपीनजी इटनकर यांनी सर्व समस्या ची सखोल चौकशी करून लवकरच समस्या सोडवण्यात येईल अशी ग्वाही दिली.

सदर कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी जिल्हा अधिकारी विपीन इटनकर, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर , शिक्षण सभापती भारती पाटील, पंचायत समिती सदस्य सुलोचना ढोके, सौ. भागवत गट विकास अधिकारी प.स नागपूर, सरपंच रीता उमरेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन बी डी ओ भागवत मॅडम तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव नागरगोजे यांनी केले.

तसेच उप सरपंच प्रशांत केवटे, तंटा मुक्ति अध्यक्ष प्रकाश मेश्राम, ग्राम. सदस्य सिध्दार्थ ढोके, गजाननजी रामेकर, सतीश खोब्रागडे, रक्षा सुखदेव, साधना शेंद्रे, अर्चना चौधरी, ईतर ग्राम पंचायत सदस्या सह श्रीकांत रामटेके, रोहित राऊत, दर्शन बेले, दारू भट्टी हटाव समिती अध्यक्ष माधुरी खोब्रागडे, जोत्सना बेले, प्रीती वाकडे, बचत गट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मोठ्या संख्येने गावतील नागरीक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement