कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक आरोग्य संस्थेला आपल्या कार्य प्रणाली द्वारे दर्जात्मक उत्पाद व रुग्ण सेवा लाभार्थींना प्रदान करून त्यांची संतुष्टी मिळवून आंतरराष्ट्रीय मानकी करन संस्था (आय.एस.ओ.) चे मानांकन प्रमाणपत्र दिनांक २६ ऑगस्ट २०१९ ला जिल्हा परिषद सभागृह नागपुर येथे मा. श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नागपुर जिल्हा यांच्या शुभ हस्ते डॉ. वैशाली हिंगे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र साटक यांना देण्यात आले.
पारशिवनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे गुणवत्ता उद्दिष्टे व धोरणे, ग्रामस्थांचा योग्य अभिप्राय, अभिलेख वर्गीकरण, शासकीय योजनें ची उत्कृष्ट अंमल बजावणी, किशोर वयीन मुलांची प्रा.आ.केंद्राला भेट, जैव वैदीकीय कचरा व्यवस्थापन व स्वछता, संसाधन व्यवस्थापन इत्यादी सर्व निकष पूर्ण केल्याने प्रा.आ.केंद्र साटक ला आय.एस.ओ. मानांकन मिळाले. डॉ. वैशाली हिंगे व त्यांच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेऊन लोकांचा संस्थेवर च्या विश्वासात वाढ करून बाह्यरुग्ण सेवा व आंतररुग्ण सेवा वाढवून, उद्दिष्टे व गुणवत्ता साध्य केली.
यास्तव डॉ. दीपक सेलोकर सर जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.नागपूर, डॉ. देबडवार सर, डॉ. प्रशांत वाघ सर ता.आ. अधिकारी, श्री.स्वप्नील सर आय एस ओ कन्सल्टंट यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे तसेच सहकारी श्री.सोनटक्के, श्री. बोदे, श्री.उईके, श्रीमती पठाण, श्री खोडे, श्री.टेंभुरकर, श्रीमती देशमुख, चव्हाण सिस्टर, कल्पना निमकर, भरणे, मानकर , तांबे, लछोरे प्रा.आ.,केंद्र साटक यांच्या सहकार्यामुळेच हे यश प्राप्त झाल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिंगे यांनी सर्वाचे तसेच ग्रामस्थांचे आभार व्यकत केले.