Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Fri, Dec 7th, 2018

सक्करदरा येथे १० अनधिकृत धार्मिक स्थळावर नासुप्रची कार्यवाही

नागपूर : मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. अश्विन मुद्द्गगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधिक्षक अभियंता (मुख्यालय) श्री. सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात दिनांक ०७.१२.२०१८ रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या दक्षिण विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

मौजा सक्करदरा येथील
१) दुर्गा माता मंदिर, आदर्श गृ.नि.स. संस्था, जुने सुभेदार.
२) नागोबा मंदिर, आरएमएस कॉलोनी.
३) शिव मंदिर व नाग मंदिर, अंबिका नगर
४) नाग मंदिर, आदर्श गृ.नि.स. संस्था, शारदा चौक
५) विठ्ठल रुक्माई मंदिर, अयोध्या नगर
६) नाग मंदिर, कबीर नगर
७) दुर्गा मंदिर, अयोध्या नगर
८) हनुमान मंदिर, अयोध्या नगर
९) माता मंदिर, ज.गृ.नि.स. संस्था
१०) नाग मंदिर, साई बाबा गृ.नि.स. संस्था

या धार्मिक स्थळांचा समावेश होता. तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली त्यांनी सामंजस्यपणा दाखवित मंदिरामधील मूर्ती स्वतः काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले. अश्या एकूण १० धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही ३ टिप्पर आणि २ जेसीबी च्या साहाय्याने आज सकाळी १०.३० ते सायकांळी ६.०० वाजेपर्यंत करण्यात आली.

यावेळी नासुप्रच्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. एस एन चिमुरकर, विभागीय अधिकारी (दक्षिण) श्री अविनाश प्र बडगे, सहायक अभियंता श्रेणी-२ श्री. संदीप एम राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक श्री राकेश पाऊल झगडे, श्री. विनोद खुळगे व नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145