Published On : Fri, Jun 26th, 2020

खाजगी शिक्षकांवर आली उपासमारीची पाळी.

खाजगी शिक्षकांनी आमदार आशीष जयस्वाल यांना दिले विविध मागन्याचे निवेदन

रामटेक: ॲडमिशनच्या वेळी लॉक डाऊन झाल्यामुळे , समोर ऍडमिशन मिळण्याबाबत रामटेक येथील अलंकार टक्कामोरे ,अतुल धमगाये ,प्रदीप माहूरकर भगवान वंजारी ह्या खाजगी शिक्षकांनी रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशीष जयस्वाल यांना निवेदन देऊन मागणी केली.
रामटेक शहरात अनेक कोचिंग क्लासेस आहेत. जे मुलांना अनेक वर्षापासून उत्कृष्ट शिक्षण देण्याचे तसेच विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहेत . कोचिंग क्लासेस च्या भरोशावर त्यांची उपजीविका चालत असते.

लॉक डाऊन मुळे खूप दिवसांपासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. ॲडमिशनच्या वेळी लॉक डाऊन झाल्यामुळे येत्या सत्रात विद्यार्थी मिळणे कठीणच झाले आहे.

त्यामुळे शिक्षकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

जवळपास तीन महिन्यांपासून कोचिंग क्लास बंद असल्यामुळे शिक्षकांचे , सहाय्यक शिक्षकांचे पगार, जागेचे भाडे, आणि विजेचे बिल हे देणे कठीण झाले आहे.

म्हणून राज्य सरकारने खाजगी शिक्षकांना मदत करावी नाहीतर कोचिंग क्लासेस बंद करण्याची व उपासमारीची वेळ आलेली आहे.

सरकारने काही अट घालून क्लास सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. लॉक डाऊन मुळे पालकांची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे वेळोवेळी फी देऊ शकणार नाही. म्हणून केंद्र सरकारच्या पॅकेज मधून खाजगी शिक्षकांना सुद्धा चार लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक परिस्थितीत जाण्यास मदत होईल प्रत्येक कुटुंबाला पंधरा हजार ते वीस हजार रुपये महिना घर चालविण्याकरिता देण्यात यावे व क्लासचे भाडे सरकारने द्यावे. अश्या विविध मागन्याचे निवेदन अलंकार टक्कामोरे ,अतुल धमगाये ,प्रदीप माहूरकर भगवान वंजारी ,मुरलीधर मेश्राम, सचिन गजभिये, कमल गोरले, सुमेध उके , नितीन गणवीर ,दिलीप ठाकरे, संजय बर्डे, वसीम खान ,जितेंद्र घोडेस्वार, शिरीष अस्वार, प्रवीण मानकर, प्रशांत पिंपळकर , शेख साधिक, प्रीती आशिया, डॉक्टर निर्मला सूर्यवंशी यां नी दिले.