Published On : Fri, Dec 27th, 2019

खासगी प्रवासी बस शहराबाहेर थांबण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात

Advertisement

प्रवीण दटके यांच्या अध्यतेखाली गठीत समितीची बैठक


नागपूर: शहरातील सर्व खासगी बसेस शहराबाहेर थांबण्याच्या प्रक्रीयेला महानगरपालिकेद्वारे सुरूवात झाली आहे. यासंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी महानगरपालिकेने प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून या समितीची पहिली बैठक गुरूवारी (ता.२६) रोजी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली.

यावेळी समिती सदस्य सुनील अग्रवाल, संदीप गवई, संजय बुर्रेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रकाश वराडे, वाहतूक विभागाचे कार्य. अभियंता शकिल नियाजी, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, योगेश लुंगे, यांच्यासह स्थावर विभागाचे संबंधित अधिकारी, पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरात खासगी बसेस, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, शाळेच्या बसेस, शहराच्या परिवहन विभागाच्या बसेस अशा चार प्रकारच्या बसेस वदर्ळीच्या ठिकाणांवरून ये -जा करत असतात. या बसेसचे शहरात ठिकठिकाणी थांबे असल्याने त्या बराच काळ तेथे उभ्या असतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. या वाहतूक कोंडीला रेखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नवे धोरण निश्चित केले आहे. याबाबत महानगरपालिकेच्या ७ डिसेंबरच्या विशेष सभेत महापौर संदीप जोशी यांनी याबाबत निर्देश दिले होते.

शहराच्या बाहेर खासगी प्रवासी बसेसला पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी उमरेड रोड व वर्धारोड वरील नागपूर मेट्रो प्राधिकरण, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पत्र पाठवावे, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. या खासगी बसेससाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत धोरण निश्चित करावे. खासगी बसेसचे शहरात ज्याठिकाणी बुकींग सेंटर आहे, त्या ठिकाणी मनपाच्या परिवहन विभागामार्फत बसेस पुरविण्यात येईल का, यबाबातचा अहवाल पाहणी करून परिवहन विभागाने सादर करावा. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत कायद्यामध्ये काही तरतुदी आहे का याचीही पडताळणी करावी, अशी सूचना प्रवीण दटके यांनी केली. पोलिस वाहतूक विभाग यांच्याशी संपर्क साधून कायद्यानुसार कार्यवाही करावी. याबाबत सर्व अहवाल सात दिवसात तयार करून पुढील बैठकीस सादर करावा. पुढील बैठक ४ जानेवारी रोजी घेण्यात येईल, असेही प्रवीण दटके यांनी सांगितले. याबैठकीत पोलिस उपायुक्त वाहतूक, खासगी बसेसचे प्रतिनिधी, महानगरपालिकेचे विधी अधिकारी यांनाही बोलविण्यात येईल. या बैठकीत खासगी बसेसच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जाईल, असेही प्रवीण दटके यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement