Published On : Sun, Mar 10th, 2019

प्रितेश घोडे ठरले मेट्रोचे पहिले प्रवासी

PRITESH GHODE

नागपूर: महा मेट्रो नागपूर द्वारे पहिल्या दिवशी आभार दिवसाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर दुसरा दिवस विनामूल्य तिकीट खरीदी करून प्रवासी नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. आज रविवार पासून महा मेट्रो द्वारे व्यावसायिक मेट्रो राईडला सुरवात करण्यात आली याला देखील पहिल्या आणखी दुसऱ्या दिवशी सारखाच भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिला. सकाळी ७ वाजल्या पासून नागपूरकर सिताबर्डी मेट्रो स्टेशन येथे जमा होऊ लागले.७ वाजून २० मिनिटांनी प्रवासी नागरिकांनी मेट्रो स्टेशन परिसरात प्रवेश करीत तिकीट काउंटर येथून तिकीट विकत घेतली, पहिल्या व्यावसायिक तिकीट विकत घेण्याचा मान छत्रपती चौक येथील रहिवाशी श्री. प्रितेश घोडे यांना मिळाला. त्यांनी सांगितले की मेट्रो सेवा ही बदलत्या काळानुरूप गरजेचे आहे,नागपूरकरांनी जास्तीत जास्ती ,मेट्रो सेवेचा उपयोग करायला हवा असे मत व्यक्त करत नागपूर मेट्रोला शुभेच्छा दिल्या. यावेळी महा मेट्रोचे महाव्यवस्थापक(ओ & एम) श्री.उराडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आज पहिल्या दिवशीच्या व्यावसायिक मेट्रो सेवेचे उत्त्पन्न रु.१,५५,०००/- इतके होते ज्यामध्ये ११ हजार नागरिकांनी प्रवास केला.

सिताबर्डी मेट्रो स्टेशन व्यतिरिक्त प्रवासी नागरिकांनी एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, साउथ एयरपोर्ट मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि खापरी मेट्रो स्टेशन येथून व्यावसायिक मेट्रो सेवेचा लाभ घेतला. मुख्य म्हणजे आजच्या मेट्रो राईड मध्ये प्रत्येक वयोगटातील नागरिक,विविध सामाजिक संस्था,विदेशी पर्यटक हे देखील उपस्थित होते. पहिल्या दिवशी ११ हजार, दुसऱ्या दिवशी १२५०० तर आज तिसऱ्या दिवशीच्या व्यावसायिक मेट्रो राईड मध्ये तब्बल ११००० नागरिकांनी मेट्रोचा प्रवास अनुभवला.

मेट्रो प्रवाश्यांच्या प्रतिक्रिया:

मंगला टाकीवाले ( वय ९२ वर्ष) :श्रीमती. टाकीवाले यांचा मेट्रो मध्ये प्रवास करण्याचा अनुभव अतिशय उत्साही होता, त्यांनी सांगितले की मी वयाच्या ९२ वर्षी पहिल्यांदा प्रवास करत जे की खूप सुंदर आणखी गारेगार आहे, रोज वर्धा रोड येथील राहत्या घरातून मेट्रो बघत होते आज प्रत्यक्ष अनुभव घेत याचा मला अभिमान आहे. नव्या पिढीने टू-व्हीलर ने प्रवास न करता मेट्रो ने प्रवास करायला पाहिजे.

रजनी गजरे ( गृहिणी):मेट्रो मध्ये दुसऱ्यादा प्रवास करीत आहे या आधी दिल्ली मेट्रो ने प्रवास केला होता पण आज स्वतःच्या शहरात मेट्रो सेवा उपलब्ध होत आहे याचा मला अभिमान आहे मी सुद्धा आता मेट्रोकर झाली आहे. नागपूर मेट्रो ला त्यांनी भरपूर शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

उद्या मेंटेनन्स कार्याकरिता मेट्रो सेवा बंद :उद्या दिनांक ११ मार्च (सोमवार) मेंटेनन्स कार्याकरता मेट्रो सेवा बंद ठेवण्यात येत असून १२ मार्च(मंगळवार) पासून नागपूरकरांन करिता मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात येईल.