Advertisement
नागपूर: येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर केंद्रीय कारागृहातील चोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला हर्ष रामटेके हा कैदी शासकीय रुग्णालयातून उपचार घेत असताना पोलीसांच्या देखरेखीखालीही पळून जाण्यात यशस्वी ठरला. ही घटना रात्री 1.44 वाजता घडली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
रामटेके याला दोन दिवसांपूर्वी अचानक चक्कर व मळमळ यांचा त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र मध्यरात्री संधी साधून, तेथील सुरक्षारक्षक झोपेत असताना तो पलायन करण्यात यशस्वी झाला. अजनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
Advertisement