Published On : Fri, May 27th, 2022

दामिनी अँप मुळे विजे पासुन प्रतिबंधात्मक उपाय

Advertisement

– मोबाईल मध्ये दामिनी अँप डाऊनलोड करा, विज कुठे पडण्यार १५ मिनीट पुर्वी सुचना.

कन्हान : – मान्सुन कालावधीत विज पडुन होणारी जीवितहानी होऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी”अँप तयार केले असुन सदर अँप गुगल पे स्टोर वर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाय योजना म्हणुन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपल्या परिसरात पडणा-या विजे पासुन होणा-या जिवित हानी टाळण्यास सुरक्षात्मक उपाय योजना सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचा-यानी वापर करून त्या परिसरातील नागरिकां ना पुर्व सुचना देऊन होणारी जिवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावे.

महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी यांचे कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग व्दारे उपविभागीय अधि कारी सर्व २. तहसिलदार सर्व ३. गटविकास अधिका री सर्व विषय “ दामिनी ” अँप च्या वापराबाबत उपरो क्त विषयाचे अनुषंगाने मान्सुन कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जीवीतहानी होत असते. विज पडुन जिवीतहानी होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “ दामिनी ” अँप तयार केले असुन सदर चे अँप गुगल पे स्टोर वर उपलब्ध आहे.

करीता सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकी य अधिकारी, कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसूल सहायक गाव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्राम सेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्राम पंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदर चे अँप डाऊनलोड करून त्याचा वापर करणे बाबत प्रवृत्त करण्यात यावे तसेच सदर चे अँप जीपीएस लोकेशन ने काम करीत असुन विज पडण्याच्या १५ मिनिटापुर्वी अँप मध्ये स्थिती दर्शवि ण्यात येते. या करीता आपले अँप मध्ये आपले सभोव ताल विज पडत असल्यास सदर चे ठिकाणा पासुन सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत चे त्यांना निर्देश देण्यात यावे.

तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे अँप डाऊनलोड कर ण्यास प्रवृत्त करावे. या बाबत च्या सुचना आपले स्तरा वरून निर्गमित करण्यात याव्यात तसेच याबाबत आप ले आपले स्तरावरून व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून दामीनी अँप पे स्टोर वरून डाऊनलोड करणे व वापरणे या बाबत माहीती दयावी. आणि त्याबाबत चा अहवाल या कार्यालयास सादर करावा. गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर अँप डाऊन लोड करून त्या मध्ये प्राप्त होणाया अलर्ट नुसार आवश्यक पुर्व सुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्या च्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.