Published On : Fri, May 27th, 2022

मनपा निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत ३१ मे ला

Advertisement

१ जूनला होणार प्रारूप प्रसिद्ध : ६ जूनपर्यंत नोंदविता येणार हरकती व सूचना

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ मे रोजी महिला आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. मंगळवारी (ता.३१) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी १० वाजता महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढली जाणार आहे.

Advertisement

महिला आरक्षणाची सोडत काढल्यानंतर बुधवार १ जून रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षणाबाबत हरकती व सूचना असल्यास त्या १ ते ६ जून या कालावधीत दुपारी 3.00 वाजतापर्यंत महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात सादर करावे लागणार आहे, अशी सूचना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement