Published On : Mon, May 14th, 2018

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने मुंबईत आगमन झाले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डी. के. जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.