Published On : Fri, Aug 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील हवालदार संजय तलवारे यांना राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवा पदक

२९ वर्षांच्या निष्कलंक सेवेला सन्मान; १९ रोख पुरस्कार आणि ३७ प्रशंसापत्रांनी गौरव
Advertisement

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील हवालदार संजय राजाराम तलवारे यांना कारागृह सेवेत उल्लेखनीय आणि प्रशंसनीय योगदानाबद्दल १५ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. सुमारे २९ वर्षांच्या निष्कलंक सेवेत त्यांनी बजावलेल्या जबाबदाऱ्या आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात येणार आहे.

संजय तलवारे यांनी २५ जुलै १९९७ रोजी कारागृह विभागात कारागृह शिपाई म्हणून सेवेला सुरुवात केली. सुमारे २४ वर्षे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर २४ जून २०२१ रोजी त्यांची हवालदारपदी पदोन्नती झाली.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सेवाकाळात त्यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृहासह भंडारा आणि चंद्रपूर जिल्हा कारागृहातही सेवा बजावली आहे. कारागृहातील बंदींची सुरक्षा, शिस्त राखणे तसेच विभागीय जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडल्याबद्दल त्यांच्या कामाचे सातत्याने कौतुक झाले आहे.

यापूर्वीही मिळाले अनेक सन्मान-
तलवारे यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल यापूर्वीही घेण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१७ रोजी अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधार सेवा विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले होते.

Advertisement

त्यानंतर १५ ऑगस्ट २०१८ रोजी उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती सुधार सेवा पदकानेही गौरविण्यात आले. आता पुन्हा राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवा पदक जाहीर झाल्याने त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे.

१९ रोख पुरस्कार, ३७ प्रशंसापत्रे-
सुमारे तीन दशकांच्या सेवेत हवालदार संजय तलवारे यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आतापर्यंत १९ रोख पुरस्कार आणि ३७ प्रशंसापत्रे मिळाली आहेत. सातत्याने मिळालेल्या या गौरवांमधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सेवाभावाची प्रचिती येते.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha #news

त्योहारों को लेकर अकोला प्रशासन अलर्ट, तैयारी तेज #vidarbhanews #akola #newsupdate #vidarbha...

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

बावनकुले ने छात्रों संग थामा तिरंगा, निकाली रैली #vidarbhanews #nagpur #newsupdate #vidarbha

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

किसानों के जमीन अधिकारों पर सरकार का बड़ा फैसला #maharashtranews #pune #newsupdate...

फडणवीस की मौजूदगी में आज भव्य तिरंगा रैली #maharashtranews #sambhajinagar #newsupdate #maharashtra

फडणवीस की मौजूदगी में आज भव्य तिरंगा रैली #maharashtranews #sambhajinagar #newsupdate #maharashtra

भिवंडी में गणेशोत्सव की तैयारियां हुईं तेज #BhiwandiNews #GaneshUtsav #GaneshChaturthi #EcoFriendly

भिवंडी में गणेशोत्सव की तैयारियां हुईं तेज #BhiwandiNews #GaneshUtsav #GaneshChaturthi #EcoFriendly

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges