Published On : Thu, Jul 30th, 2020

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ‘ गांधी का मरत नाही’ पुस्तकाची भेट

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांच्या वर्षपूर्तीनिमित्त युवक काँग्रेसचा अभिनव उपक्रम

नागपूर: युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्या पदग्रहण वर्षपूर्तीनिमित्त नागपूर युवक काँग्रेसतर्फे पारंपरिक पद्धतीला फाटा देत चंद्रकांत वानखडे लिखित ‘गांधी का मरत नाही? या पुस्तकाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांना पदाची सूत्रे हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात संघटनेला आपल्या कौशल्याची जोड देत श्रीनिवास यांनी एक वेगळी ओळख मिळवून दिली.यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यककर्त्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहे.

हे औचित्य साधून गांधी विचार अधिक घट्ट रुजविण्याचा हेतूने युवक काँग्रेसतर्फे कार्यकर्ते व नागरिकांमध्ये चंद्रकांत वानखडे लिखित ‘गांधी का मरत नाही’ या लोकप्रिय पुस्तकाचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर यांच्या हस्ते हे वितरण पार पडले. याप्रसंगी उपस्थित युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पुढेही अश्या प्रकारच्या उपाक्रमातून गांधींचे विचार अधिक घट्ट करण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी किरण राऊलवार, अंदाज वाघमारे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंग, प्रदेश सचिव डॉ.प्रणितकुमार जांभुळे, प्रदेश सचिव पियुष वाकोडीकर, शहरसचिव निलेश चंद्रिकापुरे, राहुल जगताप, पूर्व नागपूर अध्यक्ष मुकेश गजभिये, दक्षिण अध्यक्ष सुशांत लोखंडे, महासचिव सौरभ चौधरी, प्रतीक कोल्हे, पियुष घुटके, मयूर मोहोड आदी कार्यकर्ते उपास्थित होते.