Published On : Thu, Jul 30th, 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी दहा दिवसाचा लॉकडाउन घोषित करा

सर्वपक्षीयांचे तहसीलदारला निवेदन सादर

कामठी :- सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा कामठी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही पोहोचला असून या समूह संसर्गातून निर्माण झालेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करणे हा एक उत्तम पर्याय दिसतो तेव्हा तालुका प्रशासनाने धारावी पॅटर्न प्रमाणे संशयित व्यक्ती शोधुन त्यांना विलीगिकरन करावे तसेच खासगी क्षेत्रात वैद्यकिय सराव करणाऱ्यांची मदत घेऊन त्यांच्या द्वारे विलीगिकरं न क्षेत्रामध्ये अशा डॉक्टरांची नियुक्ती करीत जास्तीत जास्त कोरोना चाचणी चे प्रमाण वाढवावे , गृह विलीगिकरन शक्य नसल्यास संस्थात्मक विलीगिकरन साठी संभाव्य स्थळ उपलब्ध ठेवावीत तसेच जनतेचे समुपदेशन करून त्यांना कोरोणाबद्दल शिक्षित करणे आवश्यक असल्याने तालुका प्रशासनाने जणप्रितिनिधीचे मदत घेऊन नागरिकांना समुपदेशन करावे.

कोरोनावर मात करून कोरोनावर विजय मिळविण्यासाठी तालुका प्रशासनाने राजकीय प्रतिनिधी असल्याचे मत बाजूला सारून त्यांच्याकडे सामाजिक लोकप्रिनिधी असल्याची भूमिका सारून त्यांना विश्वासात घेत योग्य समन्वय साधून योग्य ती भूमिका साकारावी तसेच कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी कामठी तालुक्यात दहा दिवसाचा लोकडोउन लागू करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रितिनोधी च्या वतीने तहसिलदार अरविंद हिंगे यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी कांग्रेसचे पदाधिकारी व जी प स्थायी समिती सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाडे, भाजप चे पदाधिकारी व जी प चे विरोधी पक्ष नेता अनिल निधान, जी प सदस्य मोहन माकडे, कामठी पंचायत समिती सभापती उमेश रडके,उपसभापती आशिष मललेवार, पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी, दिशा चनकापुरे, सुमेध रंगारी, ऍड आशिष वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जाहिर आव्हान:-तहसिलदार अरविंद हिंगे
कामठी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ह्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे तेव्हा नागरिकांना कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करीत कोवोड तपासणी चाचणी साठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असावा व कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तहसील प्रशासनाला ज्या काही स्वयंसेवी संस्था वा इच्छुक सामाजिक व राजकीय संघटनांना सहकार्य करायचे आहे त्यांनी कामठी तहसिलदार अरविंद हिंगे यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती

संदीप कांबळे कामठी