Advertisement
नागपूर: गड्डीगोदाम येथील फ्लायओव्हरचे रॅम्प तसेच अजनी व सोमलवाडा येथील फ्लायओव्हर रॅम्पच्या भूसंपादन अनुषंगाने महामेट्रोतर्फे शनिवारी (ता. १९) सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात देण्यात आलेल्या सादरीकरणाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, अग्निशमन समिती सभापती लहुकुमार बेहते, मंगळवारी झोन सभापती संगीता गि-हे, लक्ष्मी नगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक नरेंद्र वालदे, संजय बुर्रेवार, किशोर जिचकार, लखन येरावार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, वनिता दांडेकर, पल्लवी शामकुळे, माजी महापौर राजेश तांबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अमीन अख्तर, नगर रचना सहसंचालक पी.बी. गावंडे यांच्यासह महा मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.