Published On : Fri, May 21st, 2021

पोलीस तलावाचे विस्तारित प्रस्ताव तयार करा : महापौर

Advertisement

तलावाच्या विकास कामाचे निरीक्षण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी पोलीस लाईन टाकळी येथे तालावाच्या कामाचे निरीक्षण केले. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी या तलावाच्या सौंदर्यीकरण व विकास कार्यासाठी रु ५० लाखाचे प्रावधान खासदार निधीतून केले आहे. येथे नागपूर महानगर पालिकांच्या माध्यमातून विकास कार्याची सुरुवात झालेली आहे.

महापौरांनी सांगितले की नामदार श्री नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून तलावाच्या समोरील भागात आय ब्लॉक लावणे, सुरक्षेच्या दृष्टीनी समोरील भागात गेट लावणे, तलावाच्या सभोवतलाच्या पाळीचे संताळीकरण करणे, कचरा, झुडपांची सफाई करणे, पाळीवर ३ मीटर रुंदीच्या पादचारी मार्गाचा विकास करणे , तलावातील गाळ काढणे व स्वच्छ करणे, दक्षिण पश्चिम भागात शौचालय चे बांधकाम करणे, तलावाच्या पाय-यांची दुरुस्ती इत्यादी कामे करणे प्रस्तावित आहे. त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना पोलीस विभाग मुख्यालयाचे अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकास कार्य व सौदर्यीकरण करण्यासाठी विस्तारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच पानकांदा काढून तलाव सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश हि दिले.

श्री तिवारी यांनी सांगितले कि विस्तारित प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मा.केन्द्रीय मंत्री श्री गडकरी यांच्याशी चर्चा करून त्या साठी निधी ची मागणी केली जाईल. यावेळी वैद्यकीय आरोग्य व सेवा समिती सभापती श्री संजय महाजन, ज्येष्ठ नगरसेवक श्री सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेवक श्री भूषण शिंगणे, सहाय्यक आयुक्त श्री हरीश राऊत, कार्यकारी अभियंता श्री गिरीश वासनिक, पोलीस मुख्यालय चे निरीक्षक श्री विजय प्रताप सिंग, परिहार, विभागीय स्वच्छता अधिकारी श्री महेश बोकारे, मुन्ना ठाकूर आणि अनिल अवस्थी उपस्थित होते.