Published On : Wed, Mar 17th, 2021

जेष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणात प्राधान्य- ऊके

Advertisement

कामठी : १७ मार्च-साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रेरित करावे असे आहे आवाहान नायब तहसीलदार आर टी ऊके यांनी केले

तहसील कार्यालय कामठी येथे आज दुपारी प्रभाग 11 ते 16 च्या नगर परिषद सदस्य, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांची संयुक्त बैठक नायब तहसीलदार आर टी ऊके यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना,नायब तहसिलदार ऊके यांनी 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असल्याने आपआपल्या प्रभागातील 60 वर्षा वरील नागरिकांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रेरित करावे असे सांगितले

कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाची मोफत सोय असून आधार कार्ड व मोबाईल नंबर आवश्यक असल्याचे नगरसेविका संध्या रायबोले यांनी सांगितले

यावेळी नगरसेवक लालसिंग यादव, नगरसेविका स्नेहलता गजभिये, पिंकी वैद्य, अंगणवाडी सेविका तारा जगणे, प्राजक्ता रंगारी, प्रिया कठाणे,संतोषी नेवारे,सुनिता चव्हाण व इतर अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर उपस्थित होते