Advertisement
नागपूर : प्रतापनगर चौकात सोमवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटांमध्ये वाद सुरू असताना एका तरुणाकडून दुसऱ्या गटाला धमकावले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना पाहताच संबंधित तरुणाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्ता ओलांडताना भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुण जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर प्रतापनगर चौकात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच दोन गटांतील वादाचे स्वरूप काय होते, याचा तपास प्रतापनगर पोलिसांकडून सुरू आहे.





