Published On : Sat, Mar 9th, 2019

अनधिकृत जामठा व्हीसीए स्टेडिअमवर कारवाई करा – प्रशांत पवार : क्‍लबला सील लावा

नागपूर : जामठा व्हीसीए स्टेडिअमच्या बांधकामला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. सामान्य नागरिकांवर होत असलेल्या कारवाई प्रमाणे यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जय जवान जय किसान संघटने अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

एनएमआरडीएक प्रशासनाकडून ग्रामीण भागातील 12 हजार पेक्षा इमारतींना अनधिकृत बांधकामाची नोटीस दिली असून 2 हजार बांधकाम पाडण्यात आली आहे. जामठा व्हीसीए स्टेडिअमच्या बांधकामला मंजुरी दिली नसून असून फक्त शिफारस करण्यात आल्याची माहिती जिल्हाअधिकारी कार्यालयाने एनएमआरडीएला दिली आहे. त्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. आतापर्यंत साधी एमआरटीपी अंतर्गत 53 ची नोटीस देण्यात आली नाही. येथील क्‍लबला दारूची परवानगी देण्यात आली आहे. दारूसाठी बांधकाम नकाशाच्या परवानगीची आवश्‍यक असते.

कोणतही परवागनी नसताना नियमबाह्यरित्या उत्पादन शुल्क विभागाकडून दारूचे लायसन्स देण्यात आले. व्हीसीएकडून बांधकामाची परवानगी घेण्यात आली नाही. उलट ऑकूपेंसी आणि कंम्प्लायन सर्टिफिटेक मागण्यात येत आहे. एनएमआरडीएने कारवाई न केल्यास कार्यालयासमोर उपाषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला.