Published On : Tue, Aug 18th, 2020

श्री गणेश टेकडी मंदिराच्या सेवक संस्थेत प्रशांत पवार यांची अध्यक्षपदी निवड

नागपूर : जय जवान जय किसान चे प्रशांत पवार यांनी 16 ऑगस्ट रोजी, रविवारी ला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून नवनिर्वाचित राष्ट्रवादी नेते मा. प्रशांत पवार यांची नुकतीच, श्री गणेश टेकडी मंदिराच्या सेवक संस्थेच्या वतीने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सेवक संस्थेत अध्यक्षपद गेल्या दोन वर्षापासून रिक्त होते ते त्यांनी राष्ट्रवादीचे नेते झाल्यापासून अध्यक्षपद भरून काढले त्यापूर्वी उमेश चौबे हे होते. सेवक संस्थेच्या कामगारांची एक मताने सभा पार पडली.

त्यामध्ये मानद सभासद प्रशांत पवार यांची अध्यक्षपदी निवड केली. तसेच सदस्यांची कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष दिलीप चुटे , सतीश ज्योतिषी, सचिव राजेंद्र नागमोते, सहसचिव गजानन नरुले, कोषाध्यक्ष सुधीर तारसेकर व सदस्यपदी कु. लता भोंगाडे, कमलेश लांजेवार, संजय जगताप, सुरेश खराबे, जयंतराव तांबोळी यांची निवड करण्यात आली. असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.