Advertisement
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निलंबनाचा आदेश राज्यपाल तसेच विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी गुरुवारी काढला. या निर्णयामुळे चौधरी यांना धक्का बसला असून त्यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे.
त्यामुळे चौधरी यांची जागा खाली झाल्याने विद्यापठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून प्रशांत बिकारे यांनी आज पदभार सांभाळला.
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा संपूर्ण कार्यकाळ वादग्रस्त राहिला. त्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारी लक्षात घेत राज्य सरकारने अजित बावीस्कर समिती नेमली होती. या समितीने चौकशीअंती विविध गैरव्यवहारप्रकरणी चौधरी यांना दोषी ठरविले होते.
Advertisement