Published On : Sat, Jun 2nd, 2018

संघाच्या कार्यक्रमाला जाण्यावरून प्रणब मुखर्जी यांनी प्रथमच तोडले मौन

Advertisement


कोलकाता: 7 जून रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी जाण्याच्या निमित्ताने उठलेल्या वादळावरून माजी राष्ट्रपती आणि काँग्रेस नेते प्रणब मुखर्जी यांनी पहिल्यांदा आपले मौन तोडले आहे. बांग्ला वृत्तपत्र आनंद बाजार पत्रिकच्या अनुसार मुखर्जी यांनी म्हटले आहे कि, “जे मला म्हणायचे आहे ते मी नागपुरात म्हणेल. याबाबत मला अनेक पत्र मिळाले आहे. अनेक कॉल आले आहे. मात्र मी कुणाला उत्तर दिले नाही.” यात अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश, सी. के. जाफर शरीफ, रमेश चेन्नीथाला यांचा समावेश आहे. त्यांनी या कार्यक्रमाला जाण्यावर पुर्नविचार करावा, असे म्हटले आहे.

केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेता रमेश चेन्नीथाला यांनी म्हटले आहे, रा. स्व. संघाच्या कार्यक्रमात जाण्याचा माजी राष्ट्रपतींचा निर्णय धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या लोकांसाठी झटक्यासारखा आहे. चेन्नीथाला यांनी म्हटले आहे कि त्यांनी कुठल्याही संघाच्या कार्यक्रमात जावू नये. वरिष्ठ काँग्रेस नेता चिंदबरम यांनी या मुद्दावर वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि मुखर्जी यांनी कार्यक्रमात जावे. मात्र तिथे जाऊन त्यांना सांगावे कि त्यांच्या विचारधारेत काय कमतरता आहे. त्यांनी म्हटले आहे कि जेव्हा माजी राष्ट्रपतींनी निमंत्रण स्विकारले आहे तर यात तर्क करण्यात काही अर्थ नाही कि त्यांनी असे का केले? यापेक्षा मोठा मुद्दा आहे. सर आपण जर निमंत्रण स्विकारले आहे तर कृपया तिथे जा आणि त्यांना सांगा कि त्यांच्या विचारांत काय कमतरता आहे.

इकडे रा. स्व. संघाने म्हटले आहे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी निमंत्रण स्विकारण्यात कुठलीही आश्चर्यकारक बाब नाही. संघ नेता नरेंद्र कुमार यांनी जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले आहे कि, जे कुणी संघाला जाणतात किंवा समजतात. त्यांच्यासाठी ही आश्चर्याची बाब नाही. त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. कारण कि रा. स्व. संघ प्रसिद्ध लोकांना आणि सामाजिक सेवेशी जुळलेल्या लोकांनना बोलवत असतो. यावेळी संघाने डॉ प्रणब मुखर्जी यांना निमंत्रण दिले आहे आणि ही त्यांची महानता आहे कि त्यांनी हे निमंत्रण स्विकारले.