Published On : Wed, Sep 19th, 2018

नागपुरातील ज्येष्ठ चित्रकार प्रकाश कावळे यांचे निधन

नागपूर: शासकीय चित्रकला महाविद्यालयातील अप्लाईड आर्टसचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश कावळे यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. चित्रकलेच्या क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती.

वयाच्या २० व्या वर्षीच ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. आपल्याच वयोगटातले प्रोफेसर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. लँडस्केप हा त्यांच्या आवडीचा विषय होता.

Advertisement

त्यांचा लोकमत वृत्तपत्राशी निकटचा संबंध होता. लोकमतच्या साहित्यजत्रा या रविवार पुरवणीसाठी त्यांनी अनेकदा चित्रे दिली आहेत.

तसेच जवाहरलाल दर्डा कला अकादमीचेही ते सदस्य होते.

त्यांच्या निधनाने आपण एक चांगला व्यक्ती व जवळचा मित्र गमावला असल्याची संवेदना बसोली ग्रूपचे संस्थापक व ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement