Published On : Tue, Jun 22nd, 2021

नागपुरच्या विभागीय आयुक्तपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा नव्या आयुक्त

नागपूर: नागपुरच्या इतिहासात पहिल्यांदा िवभागीय आयुक्तपदी महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा यांची नागपुरच्या ३२ व्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता वर्मा या २००१ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत.

त्या सातारा तालुक्यातील खटाव येथील असलेल्या प्राजक्ता वर्मा या एका सामान्य कुटुंबातील आहे. मुंबई महापालिकेत इन्स्पेक्टर राहिलेल्या त्यांच्या वडीलांनी त्यांना जिद्दीने आयएएस केले. प्रशासनाला लोकाभिमुख चेहरा देणाऱ्या अधिकारी म्हणून त्या प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे २००३ मध्ये काम करीत असताना महात्मा फुले जलसंधारण अभियानात लोकसहभागातून वैजापूर पंचायत समितीला १७ लाखांचे पहिले बक्षिस मिळाले.

२००९ मध्ये धुळे जिल्हाधिकारी असताना धवल भारती अभियान राबवून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे म्हणून प्रयत्न केले. सिडकोमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय िवमानतळासाठी दहा गावांचे गावठाणासह यशस्वी पुनर्वसन कोणताही संघर्ष न होता केले.