Published On : Tue, Jun 30th, 2020

एकविरा महिला गृह उद्योगाच्या कार्याची वाडी परिसरात प्रशंसा

लाकडाऊन मध्येही वाडीत महिलांना रोजगार

वाडी- (हिंगणा) वाडी नगर परिषद क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या संगीता जेम्स फ्रान्सिस यांनी लाकडाऊन मध्ये महिलांच्या हाताला काम नसल्यामुळे एकविरा महिला गृह उद्योग सुरू करून गोर-गरीब महिलांच्या हाताला काम देऊन फार मोलाची मदत केली.

लाकडाऊनमुळे परिसरातील अनेक छोटी मोटी दुकाने बंद असल्यामुळे व कामगार महिला कडे वस्तू खरेदी करिता हवा असलेला पैसा नसल्यामुळे त्यांनी गृह उद्योगाच्या माध्यमातून ५ रुपये ते १० रुपया पर्यंत असलेल्या ४० ते ५० प्रकारच्या वस्तूचे पॅकेट बेरोजगार महिलांच्या हाताला काम देऊन तय्यार करून ग्राहकांसाठी उपलब्ध केले.


यामुळे काही महिलांना रोजगार उपलब्ध झाला व ग्राहकांना कमी दरात हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतात त्यांच्या या कार्याची प्रशंसा परिसरात होत आहे.