Published On : Sat, Nov 1st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘प्रहार’चा जल्लोष; फडणवीसांच्या घोषणेनंतरबच्चू कडूंचा विजय उत्सव!

Advertisement

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी नागपुरात सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलनाला अखेर यश लाभले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर ३० जूनपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली जाईल, अशी अधिकृत घोषणा केली.

या घोषणेनंतर आज नागपुरात शेतकऱ्यांचा ‘विजय उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. शहरात आनंद आणि जल्लोषाचे वातावरण असून *“बच्चू कडू जिंदाबाद”*च्या घोषणा गुंजत आहेत.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारपासून नागपूर-हैदराबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू होते. वाहतूक ठप्प झाल्याने प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा झळकला.

आज बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले आणि अॅड. वामनराव चटप हे मुंबईहून नागपूरला परत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळ आणि आंदोलनस्थळी शेकडो शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली आहे. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीची पूर्तता होण्याची चिन्हे दिसताच ग्रामीण भागात आनंदाची लाट उसळली आहे. राज्य सरकारने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरावे, अशी अपेक्षा शेतकरी संघटनांकडून व्यक्त होत आहे.

आज सायंकाळी नागपूरमध्ये आयोजित ‘विजय उत्सवा’त हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेले हे यश राज्यातील शेतीच्या भविष्यासाठी आशेचा किरण ठरणार आहे.

Advertisement
Advertisement