नागपूर:- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली असून या गावांना येत्या दोन महिन्यात सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय जास्तीतजास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलातर्फ़े नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सर्वत्र या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून जनजागृत करण्यात आली.
या योजनेत महावितरणव्दारे शंभर टक्के सौर ऊर्जेसाठीनागपूर ग्रामीण मंडलातील चिखलीव सिंधी, नागपूर शहर मंडलातील किरमीती भारकस व कॉस्मोपॉलिटन सोसायटी आणि वर्धा मंडलातील (नागझरी व नेरी मिर्जापुर या गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना 3 किलोवॅट पर्यंत 78 हजार रुपयांची सबसिडी देण्यात येणार असून पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणने आवाहन केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट 30 हजार रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते. तीन किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी 18 हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान 78 हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे.
सर्वसामान्य वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचे लाभ कळावे, या योजनेची तपशिलवार माहिती मिळावी यासाठी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत, पंचायत समिती, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी ठिकथिकाणी महावितरणतर्फ़े प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. महावितरणच्या या उपक्रमाला नागरिकांनी देखील उत्सफ़ुर्त प्रतिसाद देत पर्यावरणपुरक स्वच्छ सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्धार यावेळि व्यक्त केला. महावितरणच्या नागपुर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी त्यांच्या अधिनस्थ असलेल्या सर्व अभियंता आणि कर्मचा-यांना हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी तासत्याने प्रोत्साहीत केले असून महावितरणच्या मुख्य कार्यालयाने या योजनेत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील निवडलेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौर ऊर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यासोबतच इतरही गावातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे मनोगत व्यक्त केले आहे.