Published On : Wed, Feb 20th, 2019

नागपूर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

Advertisement

नागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पूर्व नागपुरातील प्रभाग २४ मधील भाजपाचे नगरसेवक प्रदीप पोहणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. १ मार्चला विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांचा कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी पोहाणे अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारतील.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दरवर्षी ५० टक्के सदस्य निवृत्त होतात. सभागृहातील संख्याबळानुसार १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपच्या कोट्यातून १२ सदस्य आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी भाजपच्या सहा व काँग्रेसच्या दोन सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

Gold Rate
23 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,57,800/-
Gold 22 KT ₹ 1,46,800/-
Silver/Kg ₹ 3,29,800 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर माजी महापौर प्रवीण दटके यांनी भाजपच्या कोट्यातील सर्व १२ सदस्य नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. यात प्रदीप पोहाणे, वैशाली रोहणकर, श्रद्धा पाठक, यशश्री नंदनवार, जगदीश ग्वालबंशी, वर्षा ठाकरे, स्नेहा बिहारी, वंदना भगत, निरंजना पाटील, संजय चावरे, लखन येरवार व विजय चुटले यांचा समावेश आहे. काँग्रेसचे दिनेश यादव व गार्गी चोपरा यांचा समावेश आहे. बसपाच्या कोट्यातील एका सदस्यांची घोषणा पुढील बैठकीत के ली जाणार आहे.

प्रारंभी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून महापौर नंदा जिचकार यांनी नवीन सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. स्थगित सभा २६ फेब्रुवारीला होणार आहे.

अन् ढोल-ताशांचा गजर बंद केला
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे निवड होणार असल्याने सभागृहाबाहेर त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. सभागृहात स्थायी समितीवर वर्णी लागताच त्यांच्या समर्थकांनी सभागृहाबाहेर ढोल-ताशे वाजवायला सुरुवात केली. परंतु शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज स्थगित केले असताना जल्लोष करणे उचित नसल्याने माजी महापौर प्रवीण दटके व स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी ढोल-ताशांचा गजर बंद करण्यास सांगितले. त्यानंतर लगेच जल्लोष थांबला. व कार्यकर्ते पोहाणे यांना हारतुरे न घेता निघून गेले.

आरती ओवाळणाऱ्या चावरेंचीही वर्णी
प्रभाग ५ (ड)मधील भाजपाचे नगरसेवक संजय अरूणराव चावरे प्रभागात दिसत नाही. विकास कामे करीत नसल्याने संतप्त महिलांनी पालकमंत्र्यांच्या लकडगंज झोन येथील जनसंवाद कार्यक्रमात चावरे यांची आरती करण्यासाठी ताटात साहित्य आणले होते. मात्र पोलीस बंदोबस्तामुळे महिलांना आरती करता आली नव्हती. असे असूनही चावरे यांची स्थायी समितीवर वर्णी लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement