Published On : Mon, Jun 15th, 2020

बुधवारी जाफर नगर,सादिकाबादचा वीज पुरवठा बंद रहाणार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणा नंतर मधोमध येणारे वीज खांब आणि वीज वहिन्या भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी बुधवार दिनांक १७ जून २०२० रोजी शहरातील जाफर नगर, सादिकाबादचा वीज पुरवठा सकाळची ८ ते दुपारी १२ या वेळेत बंद राहणार आहे.

सोबतच अनंत नगर, राठोड ले आऊट, भूपेश नगर,महेश नगर, पेन्शन नगर,अवस्थी नगर,सुराणा विहार,जुना गोधनी परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील. देशखभाल आणि दुरुस्तीसाठी महाल विभागात येणाऱ्या उदय नगर,सुभेदार ले आऊट, अयोध्या नगर परिसरात सकाळी ८ ते दुपारी ११ या वेळेत,सकाळी ८ ए दुपारी १२ या वेळेत जानकी नगर,महाकाली नगर,लवकुश नगर, म्हाळगी नगर,धनगवळी नगर, चक्रपाणी नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.