Published On : Mon, May 10th, 2021

बुधवारी बाभुळखेडा,पार्वती नगरातील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक १२ मे २०२१ रोजी बाभुळखेडा,पार्वती नगरातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत वरील परिसरासोबत चंद्रमणी नगर, एम्प्रेस मिल कॉलनी, कुकडे ले आऊट, काही नगर,बॅनर्जीं ले आऊट, कैलास नगर, चंद्र नगर, भगवान नगर,द्वारकापुरी,हावरापेठ ,छत्रपती शिवाजी कॉलनी,चंद्र नगर,नाईक नगर,गजानन नगर,कुंजीलाल पेठ, बालाजी नगर, नालंदा नगर, बजरंग नगर,मित्र नगर वंजारी नगर येथील वीज पुरवठा बंद राहील

. सकाळी ६ ते ९ या वेळेत कांजी हाऊस, जोशीपुरा, विनोबा भावे नगर, वनदेवी नगर,राजीव गांधी नगर,सकाळी ८ ते ११ या वेळेत महाजनपुरा, खाटीकपुरा, कळमना येथील वीज पुरवठा बंद राहील.