Published On : Wed, May 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

देखभाल व दुरुस्तीसाठी आज काही वाहिन्यांवरील वीज पुरवठा बंद

नागपूर,: महावितरणच्या सिव्हिल लाईन्स, महाल आणि बुटीबोरी विभागांतर्गत येणाऱ्या काही वाहिन्यांवर नियमित देखभाल व दुरुस्तीक्या कामांमुळे बुधवार, 6 मे रोजी या वाहिन्यांवरील वीज पुरवठा सकाळच्या वेळी बंद राहणार आहे.

सिव्हिल लाईन्स विभागातील पुरुषोत्तम बाजार, मानसरोवर, वेलकम सोसायटी, झिंगाबाई टाकळी, गौरखेडे कॉम्प्लेक्स, हिगोली बिका सोसायटी, फ्रेंड्स कॉलनी, फाळके लेआऊट, कोलबास्वामी सोसायटी, नेताजी सोसायटी, ओंकार गौरव, नेल्को सोसायटी, अनुपम सोसायटी. पिली नदी,भंते आनंद नगर, किया शोरूम परिसर, निलगिरी अपार्टमेंट, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर, खिळा कंपनी आणि परिसर या भागातील वीज पुरवठा सकाळी 7 ते 11 या वेळेत बंद राहील.

Gold Rate
May 06- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,50,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाल विभागात सकाळी 8 ते 11 या वेळेत इंदिरा नगर, राजाबक्ष हनुमान मंदिर, रामबाग कॉलनी, जयंती मैदान, पराते फ्लोअर मिल, रामबाग पाण्याची टाकी जाटतरोडी, मूर्ती कारखाना आणि जवळपासचा परिसर. बॅनर्जी लेआउट, वसंत नगर, ईश्वर नगर, बालाजी नगर, मित्र नगर, प्रगती नगर, कैलास नगर, नाईक नगर, कुंजीलाल पेठ, पोस्ट ऑफिस, भगवान नगर, बँक कॉलनी, मेडिकल कॉलनी आणि जवळपासच्या भागातील वीज पुरवठा खंडित राहील.

तर दुसरीकडे बुटीबोरी विभागातील केईसी इंटरनॅशनल, शारदा इस्पात, सालासर, शिल्पा, दांडेकर आणि लोकमत प्रेस या औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा सकाळी 7 वाजतापासून बंद राहील.

उन्हाळ्याचे दिवस पाहता, नागरिकांनी सकाळीच आपली महत्त्वाची कामे आटोपून घ्यावीत आणि महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement