Published On : Tue, Jun 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

शहरातील काही भागांत आज वीज बंद

Advertisement

नागपूर: मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती तसेच भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांसाठी महावितरणकडून बुधवार, 4 जून रोजी नागपुरातील गांधीबाग आणि कॉंग्रेसनगर विभागांतर्गत येणाऱ्या काही भागांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवल्या जाणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत भूमिगत वीजवाहिनीच्या कामामुळे गांधीबाग विभागातील होलसेल वीजवाहिनीचा वीजपुरवठा उद्या सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहील. यामुळे होलसेल मार्केट, गांधीबाग बगीचा परिसर, जलालपुरा, भीशीकर मोहल्ला, पोथी गल्ली आणि जागनाथ रोड या भागांतील वीजपुरवठा खंडित होईल. याशिवाय, विविध वीजवाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी अंसारीनगर, चंद्रलोक, भगवाघर, हैद्री रोड, मोमिनपुरा, भानखेडा, गोविंद भवन या भागातील वीजपुरवठा सकाळी 10 ते 11 या वेळेत बंद राहील. तर सकाळी 8.30 ते 11 या वेळेत बांगलादेश, नाईक तलाव, तांडपेठ, बंगालीपंजा आणि पाचपावली या भागातील वीजपुरवठा बंद राहील. तर सिव्हील लाईन्स विभागातील उप्पलवाडी वीज वाहिनीवरील टेका नाका, शेंडेनगर, मानवनगर, संन्यालनगर, रमाईनगर, बॅंक कॉलनी या भागातील वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहील.

Gold Rate
Mar 25,2026 - Time 11.05Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,700 /-
Silver/Kg ₹ 2,37,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कॉंग्रेसनगर विभागातील प्रभावित भाग

कॉंग्रेसनगर विभागातील विविध वीजवाहिन्यांवर देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने इंद्रप्रस्थनगर, भेंडे लेआउट, मनीष सोसायटी, स्वागत सोसायटी, सीजीएस कॉलनी, जयबद्रीनाथ सोसायटी आणि शिवशक्ती लेआउट या भागांत सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत वीज राहणार नाही. लंडन स्ट्रीट वाहिनीवरील आग्ने लेआउट, गांधी बिल्डर, सुजाता लेआउट, दिनदयालनगर आणि देवीप्रभा परिसरातील काही भाग. टेलिकॉम नगर वाहिनीवरील टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, फ्रेंड्स कॉलनी, रवींद्रनगर, गावंडे लेआउट, पायोनिअर सोसायटी आणि स्वरूप नगर. लोकसेवानगर वाहिनीवरील लोकसेवानगर, साईनाथ नगर, भांगे लेआउट आणि मोखारे कॉलेज परिसरात सकाळी 8 ते 11.30 वाजेपर्यंत, गोकुळपेठ स्विचिंग सेंटरवरील रामनगर आणि गोकुळपेठ येथील वीजपुरवठा सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहील. श्रद्धानंदपेठ वीज वाहिनीवरील दक्षिण अंबाझरी मार्ग, अण्णाभाऊ साठे चौक ते व्हीआरसीई या भागांतील वीजपुरवठा सकाळी 8 ते 11.30 वाजेपर्यंत खंडित होईल. शिवाजी पार्क वाहिनीवरील शिवाजीनगर. पुष्पकुंज वाहिनीवरील रामदासपेठचा काही भाग, दगडी पार्क परिसर आणि विको लेबॉट्रीज परिसरात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत, वायरलेस वाहिनीवरील छत्रपतीनगर, हनुमान मंदिर वर्धा रोड, प्रगती कॉलनी, साहस क्रिकेट क्लब आणि अनुसया कॉम्प्लेक्स या भागांतील वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बंद राहील. विहीरगाव वाहिनीवरील नरसाळा, गारगोटी, बँक कॉलनी, पवनपुत्रनगर, सुदामनगरी, दुर्गेश नंदिनी आणि प्रभातनगर या भागांत सकाळी 8.30 ते 10.30 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहील. चिकना वाहिनीवरील निंबा, चिकना, धामना, खरसोली, पिल्केपार, सलाई गोधनी, कालडोंगरी आणि नवेगाव या भागांतील वीजपुरवठा सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत बंद राहील.

महावितरणने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सहकार्य करावे, जेणेकरून ही आवश्यक कामे वेळेत पूर्ण होऊ शकतील असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement