Published On : Tue, Jun 5th, 2018

नवेगाव खैरी हेडवर्क्स येथे विद्युत ब्रेकडाऊन, ‘फोर पोल’ संरचना कोसळली

Advertisement

नागपूर: वादळी वारे व खराब हवामानामुळे नवेगाव खैरी हेडवर्क्स भागात झालेल्या मोठ्या विद्युत ब्रेकडाऊनमुळे उत्तर व दक्षिण नागपुरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

मंगळवार दुपारी सुमारे ४ वाजता वादळी हवामानामुळे नवेगाव-खैरी हेडवर्क्स येथील इलेक्ट्रिकल यार्ड येथील ‘फोर पॉल’ संरचना वादळी वाऱ्यांसमोर टिकू न शकल्याने कोसळली.

कोसळलेली ही संरचना पुन्हा उभारावी लागणार असून वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी त्याचे अनेक भाग पुन्हा जोडावे लागणार आहेत.

मनपा पेंच प्रोजेक्ट सेल व OCWच्या चमू पुढील हवामानानुसार वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी निरंतर काम करणार आहेत.

या घटनेमुळे कच्च्या पाण्याच्या अभावी पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद ठेवावे लागणार आहे.

खालील जलकुंभ सेवाक्षेत्रातील पाणीपुरवठा बाधित राहील: नारा जलकुंभ, नारी जलकुंभ, जरीपटका जलकुंभ, धंतोली जलकुंभ, श्री नगर डायरेक्ट टॅपिंग, नालंदा नगर जलकुंभ, ओंकार नगर जलकुंभ १ व २, म्हाळगी नगर जलकुंभ, बेझनबाग जलकुंभ, मंगळवारी डायरेक्ट टॅपिंग, इंदोरा जलकुंभ, १० नं. पुलीया डायरेक्ट टॅपिंग व इंदोरा डायरेक्ट टॅपिंग.

विद्युत ब्रेकडाऊनमुळे झालेल्या पाणीपुरवठ्याच्या गैरसोईबाबत मनपा-OCW दिलगीर आहेत.