Published On : Fri, Jun 1st, 2018

रस्त्यावर दुध फेकुन शेतकरी आंदोलन सुरू

कन्हान: शेतकऱ्यानी संजय सत्येकार यांच्या नेतृत्वात आबेंडकर चौक कन्हान येथे दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करित शेतकरी आंदोलनास सुरूवात करण्यात आली.

शेती पिकाचे दिवसं दिवस भाव पड़त आहे आणि उत्पादन खर्च वाढत आहे. तसेच मदर डेयरी कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना लालच दाखवून केलेल्या फ़सवणुकीच्या विरोधात कन्हान इथे दूध रस्त्यावर फेकून केला निषेध. जवळपास नव महिन्या आदी नागपूर तसेच राज्यात मोठ्या गाजा वाज्या ने सरकार कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वप्न दखावन्यात आले. सुरुवतीला मदर डेयरी कडून शेतकऱ्यांना प्रति लिटर ५० रुपये भाव दिले.

लोकांनी ज्यामुळे घरचे दागीनेे विकुन, कर्ज काडून भेटल त्या भावात गायी, म्हसी विकत आनल्या परन्तु काही दिवसाने मदर डेयरी व सरकार ने आपले खरे रूप दखविने सुरु केले. या न त्या करना वरून दूध वापस करने,दूधाचे भाव अचानक पणे कमी लावणे ज्या दूधाला सुरुवातीला ५० रुपये भाव भेटत होते त्याच दूधाला २५-३० आज भाव मिळत आहे. आणि सरकार काही करून नाही राहली.

आज शेतकऱ्यांना मराची वेळ आली आहे. तरी सुद्ध्य सरकार तसेच सर्वच जनप्रतिनिधि, आमदार,खासदार, मंंत्री गप्प बसले आहे.याचाच रोष म्हणून आज दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सरकारचे निषेध केला. तशी नागपूर जिल्ह्यात हे सुरुवात परन्तु सरकारने तत्काळ गम्भीरयाने लक्ष नाही दिले तर शेतकरी परत या पेक्षा ताकतीने रस्त्यावर नक्की येईल.अशी सूचना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. या वेळी शेतकरी नेत संजय सत्येकार, अतुल गोरले, संदीप सरोदे, सचिन देशमुख, गोलू यादव,आशीष जीपकाटे, राकेश महादुले, मंगेश अमृते, शरद हिवरकर, जागेश्वर ठाकरे, शांताराम ढोबळे , आशीष नाटकर, धर्मेन्द्र डडुरे , निकलेश व शेतकरी बांधव उपस्थित होते .