Published On : Fri, Feb 2nd, 2018

शासकीय कार्यालयात अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे प्रविण पोटे-पाटील यांचे आवाहन

Advertisement

मुंबई : सर्व शासकीय कार्यालयामध्ये अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केले. ते आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांच्या बैठकीत बोलत होते.

श्री. पोटे-पाटील पुढे म्हणाले, सर्व शासकीय कार्यालयांनी वीजेच्या बचतीसाठी प्रयत्न करावे. शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर करावा. भारनियमन जर टाळायचे असेल तर प्रत्येकाने वीजेची बचत करणे गरजेचे आहे. या वेळी राज्यात सुरू असलेल्या अपारंपरिक ऊर्जेच्या कामाबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

राज्यात विविध ठिकाणी शासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या सोलर पॅनलचा आढावाही त्यांनी घेतला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पथदिव्यांसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्याबाबतचे निर्देशही विद्युत अभियत्यांना श्री. पाटील यांनी दिले.