रेशनकार्ड असलेल्या गरीब कुटुंबांनाही खनिज निधीतून जीवनावश्यक कीट द्याव्यात : बावनकुळे

पालकमंत्र्यांचे आभार, अभिनंदन

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शहर व जिल्ह्यातील रेशनकार्ड नसलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंची कीट देण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला त्याबद्दल त्यांचे आभार, आणि अभिनंदन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

तसेच शहर व जिल्हयातील ज्या लोकांकडे रेशनकार्ड आहे पण रेशन मिळाले नाही, अशा कुटुंबाना शासन मे जून मध्ये रेशन देणार आहे. एप्रिलमधे त्या कुटुंबाना अन्न मिळणार नाही. या गरीब कुटुंबांनाही खनिज निधीतून जीवनावश्यक वस्तूचे आणि आरोग्य विषयक किटचे वाटप करण्यात यावे अशी मागणीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ही सूचनाही केंद्र सरकारने केली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.


लॉक डाऊनचा पहिला टप्पा संपत आहे. दुसरा टप्पा सुरू होत आहे. जीवनावश्यक वस्तूंची कीट 7-8 दिवस पुरते. आगामी 15 दिवसासाठीही खनिज निधीतूनच जीवनावश्यक व आरोग्य विषयक कीट, सॅनिटायझेर, मास्क, साबण या वस्तूही गरीब कुटुंबांना दिल्या जाव्यात, अशी मागणी करून केंद्राच्या सूचनेवरून उत्कृष्ट निर्णय घेतल्याबद्दल बावनकुळे यांनी पुन्हा पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे.