
भंडारा – साकोली विधानसभा क्षेत्रात निवडणूक जवळ येताच आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिक तीव्र होत आहे. भाजप नेते परिणय फुके यांनी भाजप उमेदवार देवेश्री कपगते यांच्या प्रचारसभाेत काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
सभाेत बोलताना फुके यांनी आरोप केला की, काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या काळात फक्त अफवा पसरवण्याचे आणि मतदारांना दिशाभूल करण्याचे काम करतो. त्यांनी सांगितले की मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या गद्दारीमुळे भाजप उमेदवार अविनाश ब्रह्मणकर केवळ 208 मतांनी पराभूत झाले, आणि ह्याच फरकाने जिंकणारे नाना पटोले आज मोठमोठे दावे करत फिरतात.
फुके म्हणाले, “मी या भागात २५-३० वर्षे राजकारणात आहे. पण लोक आजही अफवांच्या खाईत पडतात. मी पहिल्यांदा निवडणूक लढवल्यावर माझ्यावर खोटे आरोप लावले, मला गुंडा ठरवले आणि लोकांना चुकीची माहिती देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे हा संपूर्ण परिसर पाच वर्षे मागे पडला.”
पुढे बोलताना त्यांनी पुन्हा नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत विचारले,ज्यांना फक्त 208 मतांनी जन mandate मिळाले, ते आज छाती ठोकत फिरतात; पण मागील पाच वर्षांत नेमका कोणता विकास झाला? हा खरा प्रश्न आहे.परिणय फुके यांच्या या तीव्र टीकेनंतर साकोलीची राजकीय लढत अधिक धगधगती झाली असून स्थानिक राजकारणात नव्या वादळाची चाहूल लागली आहे.









