Published On : Sat, Jun 30th, 2018

नागपूर अधिवेशनासाठी जाणारी पोलीस व्हॅन नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर उलटली

Advertisement

अमरावती : ४ जुलै पासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार असल्याने त्यामुळे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून नागपुरात जाणारी राज्य राखीव दलाची गट क्र.७ ची तुकडीची पोलीस व्हॅन आज शनिवार रोजी सकाळी८.१५ वाजता तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्व.लालासाहेब महाविद्यालयाजवळ उलटली. यात चालकाचा हात फ्रॅक्चर झाला असून अन्य सहा कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. यात एकूण ७ कर्मचारी होते.

नागपूर पावसाळी अधिवेशनात बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून एम.एच.२७ बी. एक्स ०३६८ या क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने गट क्र.७ ची राज्य राखीव दलाची ७कर्मचाºयांची एक तुकडी जात होती अचानकपणे चालकाचे नियंत्रण सुटले व पोलीस व्हॅन एकाएकी उलटली. यात काही अंतरावर वाहन चक्क घासत गेले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाहन चालक एस.एस.चव्हाण वय ३५ रा.अमरावती हे जखमी झाले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहे. यातील एस.डब्ल्यू. वºहाडे, एस.जी.गाडगे, एस. एस.भागवत, आर.व्ही.राठोड, जी.ई. शेळके, एन.एस.निघोट हे सहा राज्य राखीव दलाचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना टळली.

अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी राज्य राखीव दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तिवसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन प्रकरणी चौकशी सुरू केली आहे

Advertisement
Advertisement