Published On : Fri, Aug 16th, 2019

खुनाच्या गुन्ह्यातील पसार आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यशप्राप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत सन 2018 मधील काळात भादवी कलम 120(ब),302, 307, 324, 323, 504, 506, 427, 144, 147, 148, 149सहकलम 4/25 हत्यारबंद कायदा या गुन्हयात मागील एक वर्षांपासून पसार आरोपीस अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव गुलाम नजर उर्फ शेख नजर वल्द शेख मोहम्मद वय 20 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कादर झेंडा कामठी असे आहे.

सदर आरोपी वर खून केल्याच्या गुन्ह्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल असून या गुन्ह्या अंतर्गत मागील एक वर्षापासून नविन कामठी पोलिसांच्या अटकेपासून दूर होता या आरोपीला कलम 299 अनव्ये दोषारोपपत्र सुदधा पाठविण्यात आले होते तर हा आरोपी मोटर स्टँड चौकातील एच पी पेट्रोलपंप जवळ दडून बसल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच धाड घालून या सराईत गुन्हेगारास अटक करण्याची यशस्वी कामगिरी करोत सीआरपीसी कलम 299 अंतर्गत आरोपीस अटक करण्यात आले.

ही यशस्वी कामगिरो डीसीपी निलोत्पल, एसीपी परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ट पोलीस निरीक्षक संतोष बाकल , पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांडेकर, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार, मंगेश यादव, राजेंद्र टाकळीकर, सतीश ठाकूर, सुधीर कनोजिया यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे