Published On : Fri, Aug 16th, 2019

बाजीराव साखरे वाचनालयाचे लोकार्पण शनिवारी

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत प्राप्त निधीमधून नागपूर महानगरपालिकेद्वारे लष्करीबाग, आवळे बाबु चौकात निर्मित बाजीराव साखरे वाचनालयाचे (ई-ग्रंथालय) शनिवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलींद माने यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.

लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शितल उगले-तेली, बसपा पक्षनेता वैशाली नारनवरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेवक मोहम्मत जमाल, नगरसेविका मंगला लांजेवार, नगरसेवक संदीप सहारे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, आसी नगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे आदी उपस्थित राहतील.

कार्यक्रमाला शहरातील ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.