Published On : Sat, Nov 11th, 2017

Video: म्हाळगी नगर चौकात पोलिस उपनिरीक्षकला जबर मारहाण

Advertisement

नागपूर: म्हाळगी नगर चौकातील चिकन सेंटर जवळून शाळेतील विद्यार्थिनी घराकडे जात असतांना टवाळखोर युवकांनी त्यांची छेड काढली. प्रकार होत असतांना सिव्हील ड्रेसवर असलेल्या एका उपनिरीक्षकाने (पीएसआय) हटल्यावरून चार ते पाच युवकांनी त्यांना जबर मारहाण केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षकास युवकांनी ‘फिल्मी स्टाईल’ने जबर मारहाण केली. जीव वाचविण्याच्या भीतीने पीएसआय पळायला लागला. मात्र, आरोपींनी त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. या मारहाणीत उपनिरीक्षकाचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. ही घटना आज शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवºयात अडकलेल्या हुडकेश्वर पोलिस स्टेशनचा बोलबाला आहे. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास म्हाळगी नगर चौकातून विद्यार्थिर्नी जात असतांना हा छेडखानी होत असल्याचा प्रकार सुरु होता. जवळच नाश्ता करणाºया खाकी वर्दीत नसलेले पीएसआय यांनी टवाळखोरांना रोखले. त्यामुळे संतापलेल्या युवकांनी स्थानीक ठाण्यातच असलेले पीएसआय यांना दम दिला. तसेच चार ते पाच युवकांनी अचानक पीएसआय यांच्यावर हल्ला केला. त्या युवकांचा रौद्र अवतार पाहून ते हे जीवाच्या भीतीने पळायला लागले. मात्र, आरोपींनी त्यांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अधिकाºयाला होत असलेली मारहाण पाहून कुणीही मदतीला धावले नाही. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

अतिक्रमीत जागेवर चिकन सेंटर
म्हाळगीनगर चौक ते मानेवाडा मार्गावर ४ ते ५ चिकन सेंटर अनअधिकृतरित्या उभे आहेत. यामध्ये लक्की व ताज चिक न सेंटर हे भागिदार आहेत. तर इतर दोन ते तीन दुकाने हे इतर दुकानदारांची आहे. अनेकदा नागपूर महानगर पालिकेद्वारे अतिक्रमण दुकांनावर कारवाई करण्यात आली. मात्र, क ाही दिवसांतच पुन्हा दुकाने थाटण्यात येते. दुकानदारांची मनपासह पोलिस अधिकाºयांशी जवळीक असल्याने पुन्हा दुकाने सुरु होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शस्त्रे दाखवून धमकी
मारेकºयांनी अधिकाºयाला मारहाण केल्यानंतर शस्त्रे दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. सदर प्रकार दिवसाढवळ्या भररस्त्यात घडल्याने अनेक जण याचे साक्षीदार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अनेक दा तक्रारी
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची छेडखानीचे प्रकरण अनेकदा ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र, यात नाममात्र कारवाई करण्यात आली. विद्यालयाच्या समोरच महामार्ग असल्याने रस्ता वर्दळीचा आहे. म्हाळगीनगर चौकात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्याकडेने पायदळ जावे लागते. रस्त्याला लगत असलेल्या चिकन सेंटर, पानठेला व इतर दुकांनामध्ये टवाळखोर हे अनेकदा विद्यार्थिंनीशी हुल्लडबाजी करीत असतात. यात अनेकदा प्रकरणे ठाण्यापर्यंत पोहचली. परंतु, नाममात्र कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

हुडकेश्वरात पोलिसांवर अनेकदा हल्ले
हुडकेश्वर ठाण्याअंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलिस व वाहतूक कर्मचाºयांवर आतापर्यंत अनेक हल्ले झालेत. दरम्यान अनेकदा कर्मचाºयांना जबर मारहाण झाल्याचा प्रकार झाला. कर्तव्य पार पाडत असतांना नेत्यांसह वर्दस्त असलेल्या व्यक्तींसह परिचितांचा आक्रोश कर्मचाºयांना सहन करावा लागत. त्यातच कारवाई करण्यावरून वरच्यांचा दबावही असतोच. परंतु, अश्या हल्ल्यांवर वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधीतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी दबक्या आवाजात कर्मचाºयांनी केली आहे.

नव्या इमारतीचे शंभर मिटरवरच बांधकाम
संजय गांधी नगर परिसरातील खदान तलाव आहे. त्या तलावाला बुजवून तिथे हुडकेश्वर पोलिस ठाणे उभारण्यात येत आहे. त्याकरिता नवीन इमारतीचे काम सुुरु असून पायव्यापर्यंत काम पूर्ण करण्यता आले आहे. मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन शाळेच्या लगतच ठाणे असून म्हाळगीनगर चौक हे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर आहे.