नागपूर : शहरातील गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परिमंडळ क्रमांक २ अंतर्गत धंतोली, सिताबर्डी, अंबाझरी, सदर, गिट्टीखदान आणि मानकापूर या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ६४ आरोपींविरोधात कलम १६३ (२) बी.एन.एस.एस. अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या आरोपींमध्ये शारीरिक गुन्हे करणारे, मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच अवैध दारू विक्रीत गुंतलेले गुन्हेगारांचा समावेश असून त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्या आदेशान्वये हद्दपार करण्यात आले आहे. काहींना १३ दिवसांसाठी तर काहींना १० दिवसांसाठी परिमंडळ क्रमांक २ च्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
ही कारवाई पोलीस प्रशासनाची कडक आणि प्रभावी भूमिका अधोरेखित करते. नागपूर शहरात सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावेत यासाठी पोलिसांची ही पावले महत्त्वाची ठरणार आहेत.