कन्हान :- तालुका तिल् कन्हान पोलीस स्टेशन ८ कि. मि. अंतरावर पुर्वस बोरी सिंगोरी येथे कन्हान पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान अवैध जनावरांची गाडी पकडली असता गाडीत ११ गोवंश आढळुन आल्याने पोलीसांनी ११ गोंवशाला जीवनदान देऊन तसेच वाहना सह एकुण ७,लाख६५,हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई संजय भदोरिया बक्कन नंबर २१५६ वय ३० वर्ष यांचा तक्रारी वरुन फरार आरोपी चालक विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
कन्हान पोलीसां कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १८ एप्रिल २०२१ ला रात्री १२:३० ते १:३० वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून बोरी सिंगोरी येथे नाकाबंदी करुन यातील वाहन क्रमाक एम एच २७ – बी.एक्स – ३४५७ ला थांबविले असता वाहना मध्ये ११ गोवंशाचे चार ही पाय व तोंड दोरीने बांधुन त्यांना क्लेशदायक वागणुक देऊन व त्यांचासाठी कोणतीही चारापाण्याची व्यवस्था न करता वाहना मध्ये कोंबुन त्यांना कत्तल करण्याकरिता घेवुन जातांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी सदर वाहन व यामध्ये असलेले ११ गोवंश असा एकुण किंमत ७,६५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई संजय भदोरिया बक्कन नंबर २१५६ वय ३० वर्ष यांचा तक्रारी वरुन फरार आरोपी चालक विरुद्ध अपराध क्रमांक ११४/२०२१ कलम ४२९ भादंवि , सहकलम ११(१) , (अ) , (ड) , (ई) , (फ) , प्रा.छ.पु अधिनियम कायदा सहकलम ५ (अ) (ब) प.स अधिनियम कायदा सहकलम १८४ मोवाका तहत गुन्हा दाखल करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
सदर कारवाई नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला , उपाअधिक्षक श्री राहुल माकणीकर , उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान मुख्तार बागवान , यांचा मार्गदर्शना खाली कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार श्री सुजितकुमार क्षीरसागर , पोहवा जयलाल सहारे , नापोशि कृणाल पारधी , राहुल रंगारी , पोशि संजय भदोरिया , सुधिर चव्हान , शरद गिते , मुकेश वाघाडे , सतीश तांदळे , निसार शेख , जितेंन्द्र गावंढे , सह आदि ने ही कारवाई केली आहे .