Published On : Mon, May 7th, 2018

पोलीस भरती घोटाळा: मुख्य साहाय्यक सूत्रधार शुक्राचार्य टेकाळेला अटक

arrested

नांदेड: पोलीस भरती घोटाळ्यातील मुख्य साहाय्यक आरोपी शुक्राचार्य बबन टेकाळेला अटक करण्यात आली आहे.

परीक्षेचे कंत्राट मिळालेल्या कंपनीनेच विश्वासघात करुन उमेदवारांचे कोरे पेपर परस्पर सोडवून त्यांना अधिक गुण दिल्याप्रकरणी नांदेडमध्ये पोलीस भरती घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणातील महत्वाचा सूत्रधार शुक्राचार्य बबन टेकाळे याला रविवारी रात्री अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकाला टेकाळे याचा शोध लागला. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ११ मे पर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

तीन दिवसापूर्वी अटक करण्यात आलेल्या शेख फकीरकडून २६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यामुळे या घोटाळ्यात आजपर्यंत ४६ लाख रुपये जप्त करण्यात आले असून आरोपींची संख्या आता १७ वर गेली आहे. मात्र या प्रकरणाची गुप्तता पोलिसांनी बाळगली असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement