नागपूर: नागपूरच्या अमरावती मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या प्रसिद्ध डॉकयार्ड कॅफेमध्ये चालणाऱ्या हुक्का पार्लरवर अंबाझरी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. यासोबतच पोलिसांनी कॅफेचा मालक आणि हुक्क्याचा माल पोहोचवणाऱ्या विरोध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत पोलिसांनी अंबाझरी निवासी व्यवस्थापक अभिलाष्ट गौतम भावे (३३) याला ताब्यात घेतले. पार्लरचा चालक यश अतुल राय (वय 29, रा. गणेशपेठ) आणि हुक्का पुरवठा करणारे अमित राजू कंगाळे (22, रा. राम नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनूसार,काल रात्री अंबाझरी पोलिस ठाण्याचे पथक व डीबी पथक गस्त घालत होते. त्याचवेळी अमरावती मार्गावर असलेल्या डॉकयार्ड कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी पार्लरवर छापा टाकला. या छापेमारीत अनेक तरुण हुक्का ओढताना आढळून आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पाच हुक्क्याची भांडी, तंबाखूसह हजार रुपयांचा माल जप्त केला.
पोलिसांनी पार्लर आणि त्याच्या चालकावर तंबाखू-आधारित हुक्का पार्लरवर बंदी घालणे, फूड कोर्ट परिसरात ग्राहकांना नॉन-हर्बल हुक्क्याची विक्री आणि तंबाखू उत्पादने, जाहिरात,व्यापार आणि व्यावसायिक व्यवहारांवर बंदी तसेच उत्पादनांचा पुरवठा आणि वितरण नियमाचे उल्लघन केल्यामुळे गुन्हा दाखल केला. तसेच पुढील तापस सुरू केला आहे.