नागपूर : शहरातील अवैध हुक्का पार्लरविरोधात अंबाझरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन हॉटेल्सवर छापेमारी केली. या कारवाईत अवैधरित्या हुक्का सेवा सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित हॉटेल्सना एक महिन्यासाठी सील करण्यात आले आहे.
‘हॉटेल निंबस’, ‘हॉटेल हर्षेश’ आणि ‘हॉटेल सोरो’ अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे आहेत. पोलिसांना या ठिकाणी गुप्तपणे हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली.
तपासादरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ग्राहकांना गुप्त मार्गाने प्रवेश दिला जात असल्याचे उघड झाले. बाहेरून दरवाजाला कुलूप लावून आतमध्ये हुक्का पार्लर सुरू ठेवण्यात येत होते.
यापूर्वीही संबंधित हॉटेल चालकांना हुक्का सेवा बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र, आदेशानंतरही हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळल्याने पोलिसांनी कठोर पाऊल उचलत तिन्ही हॉटेल्सना एक महिन्यासाठी सील केले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









