Published On : Sun, Aug 18th, 2019

पोलिसांनी दिले 9 गोवंश जनावरांना जीवनदान

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव मार्गे एका चारचाकी वाहनाने 9 गोवंश जनावरे अवैधरित्या वाहून नेत असता रात्रगस्त वर असलेल्या पोलिसांनी या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने वाहन न थांबवता पोलिसांची नजर चुकवून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शिताफीने या वाहनाचा पाठलाग करून आजनो रेल्वे फाटक जवळ या वाहनावर यशस्वीरीत्या धाड घालून वाहन तांब्यात घेत वाहनात निर्दयतेने बांधून असलेले व अवैधरीत्या कत्तलीसाठी वाहून नेत असलेले 9 गोवंश जनावरे तांब्यात घेऊन गोवंश जनावरांना नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही सकाळी 7 वाजता केली असून या धाडीतून जप्त वाहन क्र एम एच 40 बी जो 9590 किमती 3 लक्ष रुपये व जप्त गोवंश जनावरे किमती 90 हजार रुपये असा एकूण 3 लक्ष 90 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी वाहनचालक अनवर अली शब्बीर अली रा भाजीमंडी कामठी वर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले.

….ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल, एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, एएसआय इकलाख शेख, अतुल सांगोळे, बब्बा बलराजे, द्विवेदी, प्रभू भगत यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी