Published On : Sat, Oct 9th, 2021

मनपाच्या पुढाकारातून नेताजी चौक बाबुपेठ येथे पोलीस चौकी

– आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेवरून नागरिकांची मागणी पूर्ण

चंद्रपूर : नेताजी चौक, बाबुपेठ परिसरात प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. येथे पोलीस बीट सुरु करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करुन देण्यात आली. सात ऑक्टोबर रोजी मृत वैष्णवीचे वडील अशोक आंबटकर यांच्या हस्ते पोलीस चौकीचे उदघाटन करण्यात आले.

Advertisement

शहरातील बाबूपेठ परिसरातील वैष्‍णवी आंबटकर या युवतीची निर्घृण हत्‍या झाली होती. त्यानंतर माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आंबटकर कुटूंबियांची भेट घेत त्‍यांचे सांत्‍वन केले. वैष्‍णवीच्‍या हत्‍येप्रकरणी प्रशासनाप्रती रोष निर्माण झाल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, याकरीता नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे परिसरात एक पोलीस बीट स्थापन करण्याची मागणी केली.

Advertisement

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा कार्यालयातर्फे पोलीस विभागास एक पोलीस बीट स्थापन करण्याकरीता जागेची व्यवस्था करुन देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेकरीता नेताजी चौक, बाबुपेठ या परिसरात पोलीस बीट उपलब्ध व्हावे, याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून जागेची व्यवस्था करुन देण्यात आली. या जागेवर आता पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.

मृत वैष्णवीचे वडील अशोक आंबटकर यांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून पोलीस चौकीचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, ठाणेदार सुधाकर अंभोरे, चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक दीपक चालूरकर, झोन १ च्या सभापती छबूताई वैरागडे, भाजपचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपच्या गटनेत्या जयश्री जुमडे, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक श्याम कनकम, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका ज्योती गेडाम, संदीप आगलावे, चंद्रशेखर गन्नुरवार, राजेश यादव, कुणाल गुंडावार, दशरथ सोनकुसरे, आकाश ठुसे, दिवाकर पुद्धटवार, जयेंद्र अडगुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement